• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home सामाजिक उपक्रम

भिलाईपाडा येथे हरघर दस्तक अभियानांतर्गत आरोग्य व लसीकरण शिबिर

नवनिर्माण संस्था व खाजगी प्राथमिक शाळा भिलाईपाडा यांचा उपक्रम

NGO ख़बर by NGO ख़बर
January 26, 2026
in सामाजिक उपक्रम
492
0
304
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नंदुरबार : नवनिर्माण संस्था नंदुरबार व आरोग्यवर्धिनी केंद्र नांदरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने भिलाईपाडा येथील राजीव गांधी भवनात आरोग्य लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. पाटील होते. प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते रणजित राजपूत व ग्रामसेवक बी एस अहिरे, मणीलाल गायकवाड उपसरपंच दिलीप वळवी उपस्थित होते. 

यावेळी गावातील एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना कोव्हीशिल्ड लस देण्यात आली.  ज्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे त्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले. गावातील नागरिकांची नेत्रतपासणी, करून गरजूंना चष्मे वाटप तसेच डायबिटीस व बीपीचा त्रास असलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले. सर्दी अंगदुखी तसेच डोकेदुखीचा त्रास असलेल्या सर्व नागरिकांना मोफत औषधोपचार करण्यात आले. आरोग्य शिबिरासाठी डॉ. तमायचेकर व टीम, आय सी टी सी लॅब यांनी जबाबदारी पार पाडली. 

आरोग्य विभागाचे डॉ. संदीप काकूंस्ते, कुळकर्णी व पिंगळे  सिस्टर यांनी मोलाचे सहकार्य केले. गावातील जवळपास १०० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच कोव्हिशिल्ड लसीचे लसीकरण पहिला डोस व दुसराडोस मिळून २५ लाभार्थ्यांनी लस घेतली.

कार्यक्रमाला  ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका आशाताई यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षिका वृषाली नांद्रे गावातील संजय वळवी, मुकेश वळवी, रमेश सोनवणे ,संजय सोनवणे, कोरसु गावित उखड्या मोरे, प्रवीण वळवी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक संजय वळवी भूमिका भगत, मनीषा पाडवी, पूजा शर्मा, कौशल्या चौरे, दिलीप पावरा, शोभा मराठे आदींनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नांद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी दादा गोसावी यांनी केले.

Previous Post

जागतिक स्मृती दिनानिमित्त पुण्यातील चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क येथे जनजागृती

Next Post

संविधान दिनानिमित्त “जागर संविधानाचा” उपक्रमाची सुरवात

Next Post

संविधान दिनानिमित्त "जागर संविधानाचा" उपक्रमाची सुरवात

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (169)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (115)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 NGO Khabar All Rights Reserved.

Go to mobile version