सोलापूर : शहरामध्ये बेवारस मनोरुग्काणांसाठी काम करणाऱ्या संभव फाउंडेशनच्या कार्याच्या माहिती पत्रिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. सदर माहिती पत्रिकेचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्त्या नुसरत खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते यु.सी.डी प्रमुख वसीम शेख, संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण, कॅकट्स फाऊंडेशनचे रोहित पहाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
२०१६ पासून मनोरुग्ण, बेघर वयोवृद्धलोक, भिक्षेकरी, वंचित निराधार लोकांना सेवा देणाऱ्या या संस्थेनेआतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातून बेवारस व घरातून बाहेर पडून भटकणाऱ्या मनोरुग्णांनाच पुनर्वसन केलं आहे. त्यातील रुग्णांना हक्काचा निवारा मिळवून देण्यास यश आले आहे. यासोबत वृद्ध व आजारी व्यक्तींना देखील मदत करण्यासाठी संभव मार्फत प्रयत्न केले जातात. समाजातील शेवटचा घटक मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे. आरोग्य राखण्याच्या मुलभूत व प्राथमिक हक्कांपासून कुणीही वंचित राहु नये या तळमळीने संभव फाऊंडेशन कार्य करत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये मानसिक आजारासंदर्भात तसेच मनोरुग्णांसदर्भात भरपूर गैरसमज आहेत व यामुळे माणसा-सारखा माणूस असून देखील मनोरुग्ण आजही वंचितच राहत आहेत हे चित्र बदलणे गरजेचे आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून संभव फाऊंडेशनने आपल्या माहिती पत्रिकेचे प्रकाशन केले आहे. इॅथासच्या अंजली वाघमारे यांच्या मदतीने आणि अमित रोडगे यांच्या अक्षर डिझाईनने साकारलेल्या माहिती पत्रिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभव फाउंडेशनच्या अस्मिता गायकवाड, आरती लांडे, सहेर पहाडे, रामेश्वर इराबत्ती आदींचे सहकार्य लाभले.







