सांगली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या इस्लामपूर वाळवा तालुका कार्यकारिणीच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवडी महाराष्ट्र्रदिनी करण्यात आली. इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात निवड जाहीर करण्यात आली. अंनिस राज्य कार्यकारी सदस्य राहुल थोरात, फारुख गवंडी आणि सांगली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे यांनी निरीक्षक म्हणून या निवडी जाहीर केल्या.
अंनिसच्या राज्य अध्यक्ष सरोजमाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंनिसच्या वाळवा तालुका अध्यक्षपदी प्रसिद्ध डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. नीलम शहा यांची तर उपाध्यक्षपदी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांची निवड करण्यात आली, कार्याध्यक्ष म्हणून डॉ.एस. के.माने आणि प्रधान सचिव म्हणून डॉ. राजेश दांडगे यांची निवड करण्यात आली.
यावेळी समितीच्या विविध विभागांच्या कार्यवाहांची निवड करण्यात आली. यामध्ये बुवाबाजी संघर्ष विभाग डॉ. अमित सूर्यवंशी, वार्तापत्र व प्रकाशन विभाग विक्रम सावंत, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभाग प्रा. पी. एच. पाटील, महिला विभाग प्रा. स्मिता पाटील, विविध उपक्रम विभाग डॉ. अलका पाटील, जात निर्मूलन व विवेकी जोडीदार निवड विभाग मीरा शिंदे, मानसिक आरोग्य विभाग डॉ. जी.बी. कांबळे, युवा विवेक वाहिनी विभाग प्रा. सीमा परदेशी, सोशल मीडिया विभाग सागर रणदिवे, कायदा विभाग ॲड. सचिन पाटील आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रमुखपदी विजय कुंभार यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा समितीच्या राज्य अध्यक्ष मा. सरोज पाटील (माई) राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, प. रा. आर्डे, विश्वास सायनाकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.