पुणे : अराध्या एनजीओ सपोर्ट सेंटरच्या वतीने स्वंयसेवी संस्था (एनजीओ) च्या राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अराध्याच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमात उपस्थित संस्थामधून समजासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकूण १० संस्थाना प्रत्येकी रुपये १० हजार या प्रमाणे एकुण १ लाख रुपये देणगी स्वरूपात अराध्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थाना देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी केशव धेंडे (Internatioanl CSR winner) यांनी उपस्थित संस्थाना मार्गदर्शन केले. यावेळी मुंबई, जळगाव, लातूर, बीड, कोल्हापूर, अकोला या ठिकाणाहून संस्था चालक उपस्थित होते.
अराध्या एनजीओ सपोर्ट सेंटर ही अशी कंपनी आहे जी राज्यातील संस्थाना प्रशिक्षण देणे, निधी मिळवून देणे, संस्थाना सर्व आवश्यक प्रमाणपत्रे काढून देण्यासाठी काम करते. संपुर्ण राज्यात काम करणारी व प्रामाणिक सेवा देणारी पहिली व एकमेव एनजीओ कन्सल्टन्सी हा नावलौकिक मिळविला आहे.
कोणत्या ही क्षेत्रात कन्सल्टन्ट फी घेऊन सेवा देतात हे अनुभवयास मिळते परंतु राहुल ढवाण यांच्या मार्गदर्शनाने सेवेत असलेली अराध्या एनजीओ सपोर्ट सेंटर ही देशातील पहिली अशी कंपनी ठरलीय ज्या कन्सल्टन्सीने देणगी स्वरूपात मदतही केली आहे. अशा प्रकारे मदत करण्याचा प्रकार सर्वांसाठी पहिलाच असावा त्यामुळे सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
याबाबत राहुल ढवाण यांचेशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आम्ही राज्यातील समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थाना बळकटी देण्यासाठी त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिक काम करत आहोत व पुढेही हे काम असेच प्रामाणिक करित राहू .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष खिळे यांनी केले तर आभार रणजित ढवाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप गोळे, सारंग ढवाण, किरण ढवाण, कृष्णा शेळके, माऊली आहेर आदिंनी विशेष प्रयत्न केले.







