पिंपरी चिंचवड : पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाऊंडेशन संचलित विठाई वाचनालयात महाराष्ट्र स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विठाई वाचनालयाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी दिली जाते. हा दिवस मराठी माणसाचा दिवस मानला जातो. तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आजच्या दिवसाचे औचित्य साधून विठाई वाचनालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विठाई वाचनालयाच्या सर्व सभासदांनी अभिवादन करण्यात आले. तसेच, फाऊंडेशनचे संस्थापक संजय आबा भिसे व अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी कामगार दिनानिमित्त कामगारांना देखील शुभेच्छा दिल्या.