नागपूर : शहरात वाढत असलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे जनसामान्यांची तहान भागवण्यासाठी प्रियदर्शनी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेतर्फे सार्वजनिक पाणी प्याऊ सुरु करण्यात आला. मनीष भाऊ सोंकुवर यांच्या हस्ते पाणी प्याऊचे उद्घाटन करण्यात आले.
सार्वजनिक पाणी प्याऊचे हे सलग चौथे वर्ष असून संस्थेतर्फे उन्हाळ्यात पाणी प्याऊ सुरु करण्यात येतो. उन्हाळ्यामुळे याचा उपयोग सर्व नागरिकांना होत आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रशांत भाऊ ढाकने, पंकज थोरात, मिलिंद लोखंडे, तसेच संस्थेचे अध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे, सिध्दार्थ बंसोड, शुभम दामले, प्रशिक वाहाने, पलाश मून, कुणाल पाटील, यश कुंभारे, कुकडे ले आऊट अभ्यासिका ग्रुपउपस्थित होते. बुध्द वंदना घेऊन पाणी प्याऊची सुरवात करण्यात आली.