पिंपरी चिंचवड : श्रावण मिहिन्यातील सणांचा आनंद कष्टकरी, सफाई कामगार महिलांना सुद्धा घेता यावा म्हणून विद्यार्थिंनींनी पिंपरी चिंचवड मनपा गणेशनगर विभागातील सर्व सफाई कामगार व कष्टकरी महिलांच्या हातावर मेहंदी काढून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. नागपंचमी निमित्त खिंवसरा पाटील विद्या मंदिर येथे ‘मेहंदी स्पर्धेचे‘ आयोजन करण्यात आले होते.
सतत कष्ट करणार्या, परिसराची स्वच्छता करणार्या महिलांच्या हातावर मेहंदीचा रंग चढल्यावर त्यांनी शालेय विद्यार्थिंनींना प्रेमाने आशीर्वाद दिले. तसेच शाळेने हा अनोखा उपक्रम घेवून एक सामाजिक घटक म्हणून आमचीही दखल घेतली याचा आनंद कष्टकरी महिलांनी व्यक्त केला. आपल्यामुळे दुसर्यांच्या चेहर्यावर आलेला आनंद पाहून आपलाही चेहरा समाधानाने उजळतो याची प्रचिती यानिमित्ताने विद्यार्थ्यांना आली.