सोलापूर : महेश जेऊर मित्र परिवार व शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने एस. के. बिराजदार प्रशालेतील १० गरीब व गरजु विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी शैक्षणिक दत्तक घेण्यात आले. कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलेले गांभीर्य लक्षात घेता महेश जेऊर यांनी १० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेतले.
याप्रसंगी प्रस्तावना करताना महेश जेऊर म्हणाले की, मी देखील तुमच्यासारखाच सामान्य कुटुंबातला तरुण असून, मला देखील गरिबीची जाणीव आहे, शिक्षण हे माणसाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक असून, पैशाअभावी कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये याची जाणीव मला असल्याने मी माझा खारीचा वाटा या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लागावा याकरिता हा उपक्रम हाती घेतला असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना शाळेचे मुख्याध्यापक वांगीकर सर म्हणाले की, महेश जेऊर यांचे कार्य हे कौतुकास्पद असून, त्यांना सामाजिक भान असल्यामुळे ते वर्षभर सामाजिक उपक्रम घेत असतात. उपस्थित प्रमुख मान्यवर सुरेश पाटील व जगदीश पाटील यांचे कौतुक करताना वांगीकर म्हणाले की, आपण दोघेही २५ वर्ष नगरसेवक आहात व आपला भाग सुजलाम सुफलाम केलात, तसेच आपण नगरसेवक पेक्षाही मोठं पद घेऊन शेळगीच्या विकासासाठी हातभार लावावा कारण, जुळे सोलापूर परिसर शेळगी नंतर मोठ्या प्रमाणात विकसित झाला असून, शेळगीचा पाहिजे तसा विकास झाला नाही, आपण दोघांनी मनावर घेतलं तर या भागाचा सुजलाम सुफलाम कराल असे प्रतिपादन वांगीकर सर यांनी केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील, माजी स्थायी समिती सभापती जगदीश अण्णा पाटील, संजय दादा साळुंखे, जितेंद्र शिंदे, कल्याणी चडचण काका, अप्पू स्वामी, कल्याण चौधरी, अक्षय अंजिखाने, यतीराज होनमाने, सतीश पारेली, आकाश मकाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसवराज चडचण, प्रणव लालसंगी, शुभम साखरे, नितीन पाटील, शिवानंद देवकते, केदार करजगी, वैभव अमाने, अमर मालगत्ती, परमेश्वर घंटे, प्रितम अमाने, म्हानतेश पाटील दत्ता मस्तुद, एस. बिराजदार शाळेमधील सर्व शिक्षक आणि कामगार स्टाफ आदींनी परिश्रम घेतले. विशेष सहकार्य वरिष्ठ शिक्षक श्रीमंत मोरे यांचे लाभले.