पुणे : कोविडमध्ये एकल झालेल्या महिलांसाठी निर्माण संस्थेच्या वतीने कायदेविषयक कार्यशाळा कामगार श्रमिक भवन मनपा येथील सभागृहामध्ये संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये १२०हून अधिक एकल महिला उपस्थितीत होत्या. भारताचे संविधानाचे प्रस्ताविकेचे वाचन करून या कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली.
या कार्यशाळेत ७५ एकल महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्याचे कीड ( बॅग, बुक्स, कंपास बॉक्स वह्यापेन) स्वरूपात साहित्य मदत म्हणून वाटप करण्यात करण्यात आले. तसेच महिलांना महिला करिता ज्या काही शासकीय योजना आहेत याची माहिती मिळावी त्या करीता माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.
या एकदिवशीय कार्यशाळेस प्रमुख पाहुण्या म्हणून हवेली तालुक्याच्या संरक्षण अधिकारी भाग्यश्री घाडगे उपस्थित होत्या. त्यांनी बालसंगोपन, बाल न्याय निधी , संजयगांधी निराधार या योजनाबद्दल माहिती दिली. महिलांचे मालमत्ता विषयक हक्क व घरगुती हिंसाचार या विषयावर अँड. अर्चना मोरे यांनी मार्गदर्शन केले, तर मिळूनसाऱ्याजणी या साप्ताहिकेच्या संपादिका गीताली विनायक मंदाकिनी यांनी महिलांना रूढी परंपरा व स्त्रीचे अस्तित्व यावरमार्गदर्शन केले. उदयकाळ फाऊंडेशनचे संस्थापक मयूर बागुल यांनी शासकीय योजना मिळवताना काय अडचणी येतात यावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये एकल महिलांच्या समस्या व उपायोजना यावर चर्चा घडवून आणली व मार्गदर्शन करण्यात आले.
निर्माण संस्थेच्या वैशाली ताई भांडवलकर यांनी या कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन अमृताजगदाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन चेतना उफाडे, अस्मिता पवार, दत्ता पांडगे, राजेंद्र शेंडगे, स्नेहल जगदाळे, निशा दहिरे, ज्योती खांडरे, विक्रांत अवचींदे यांनी केले.
निर्माण संस्था गेल्या दोन वर्षांपासून महिलांच्या व बालकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. पुणे व सातारा जिल्ह्यातील३०० एकल महिला व बालकांबरोबर नागरिकतत्वांचे पुरावे, विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे, महिलांना समुपदेशन व महिलांचा संपत्तीचा हक्क व कौटूंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम या कायद्याची जनजागृती करणेतसेच शासन स्तरावर या महिलांच्या व बालकांच्या प्रश्नाबाबत संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा करणे इत्यादी कामे करत आहे. याचाच एक भाग म्हणून कोविडमध्ये एकल झालेल्या महिलांसाठी कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.