खोपोली : खिदमते खल्क सामाजिक संस्थेच्या वतीने खालापूर तालुक्यातील सर्व शाळेतील १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
मुस्लिम समाज हॉल येथे पार पाडलेल्या या कार्यक्रमाला
प्रमुख पाहुणे म्हणून अय्युब तांबोळी साहेब (तहशीलदार खालापूर),
शिरीष पवार साहेब (पी.आई साहेब खोपोली पोलिस स्टेशन),
आतिकखोत (मुस्लिम वेलफर ट्रस्ट अध्यक्ष), शेखरजांभले (सहजसेवा फॉउंडेशन अध्यक्ष), असफाक पटेल (खिदमते खल्क मेंबर), जीनी मॅडम (माजी नगरसेविका ), राजेंद्र फक्के (माजी नगरसेवक ), गुरुनाथ साठेळकर (अपगात ग्रस्त संस्थेचे अध्यक्ष) तसेच खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे आयोजन खिदमते खल्क चे सर्व सदस्य, महिला पदाधिकारी, अशपाक लोगडे, शमसुद्दीन शेख, यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुज्जफर मांडलेकर यांनी केले.