परभणी : रंगनाथ नगरातील ज्येष्ठ नागरीक रेणुकादासराव चिटणीस, वय ८२ यांचे २१ जूलै रोजी निधन झाले. चिटणीस कुटूंबियांनी गोडजेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परंपरेप्रमाणे धार्मिक विधी केलेच परंतु, या निमित्त रक्तदान शिबीरातून परिवारातील बहुतांशी सदस्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी दाखविली.
या रक्तदान शिबीराकरीता अनिरुध्द कुलकर्णी यांनी उत्तम नियोजन केले होते. या शिबिराला अन्वेषा कुलकर्णी, संजय कुलकर्णी, मनोज जगदीश साखरेकर, सीमा कुलकर्णी, स्वप्नील कुलकर्णी, दीपा कुलकर्णी, सचिन सुधाकर चिटणीस, विक्रम चिटणीस, वेदांगी चिटणीस, प्रतीक चिटणीस, वरद सतिश चिटणीस यांच्यासह आदींनी रक्तदान केले.