पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी न्यास आणि मोबाईल कंपनी शाओमी यांच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पसुरे येथील विद्यार्थांना दीड हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामुळे गोर-गरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रसंगी संस्थेचे अधिकारी प्रितेश पितळे, आरोही माचीकर, प्राचार्य आनंदराव वीर, सर्व शिक्षक, इतर कर्मचारी, विद्यार्थी, पसुरे गावाचे मान्यवर बाळूतात्या धुमाळ, राजेंद्रआबा धुमाळ, संजीवन धुमाळ, संपतराव सणस, रमेश धुमाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.