ठाणे : जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स नियत्रंण व प्रतिबंध विभागातर्फे मंथन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा उत्कृष्ठ कार्याबद्दल गौरव करण्यात आला. जिल्हा रुग्णालय ठाणे येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ममता पळसकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
मंथन फाउंडेशन, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी, नवी मुंबई, येथे ट्रक चालक, क्लिनर, हेल्पर, लोडर साठी HIV एड्स, गुप्तरोग यावर जनजागृती व तपासणी करते. जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियत्रंण विभाग ठाणे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाढवे, जिल्हा पर्यवेक्षक नीलिमा पाटील, अशोक देशमुख, डॉ. मोरे, डॉ. परदेशी व ठाण्यातील इतर एचआयव्ही वर काम करणाऱ्या संस्था उपस्थित होत्या.
संस्थेच्या कार्यक्रम व्यवस्थापक प्रमिला खराडे, समुपदेशक सुप्रिया लोखंडे, लेखापाल शीतल कोळी, हर्षदा, प्रिया, मनोज, मोनिका, ज्योती, ओमकार, विक्रम आदी उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले, व अजुन चांगले कार्य करण्यास प्रोत्साहन दिले.