पुणे : डॉक्टर्स दिन व जागतिक कृषी दिनाच्या निमित्ताने सामाजिक वनीकरण विभाग व चाकण डॉक्टर्स असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने चाकण व आळंदी वनपरिक्षेत्रात २००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चाकण-आळंदी वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी, चाकण डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनविभागाचे सर्वश्री जाधवर, वसुंधरा ग्रुपचे बापू शेवकरी, पर्यावरण समतोल व सृक्षसंवर्धन यासाठी मनोभावे कार्य करत असलेली मराठी उदयोन्मुख अभिनेत्री अर्या, संस्कार ग्रुपचे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कंपन्यांचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमाला चाकण डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संपत केदारे, सेक्रेटरी डॉ. अमोल बेनके, डॉ. पल्लवी बेनके, उपाध्यक्षा डॉ. प्रज्ञा भवारी, डॉ. विजय भावरी, डॉ. लक्ष्मण राऊत, डॉ. नवनाथ जाधव, डॉ. विजय पवार, डॉ. शिल्पा कुलकर्णी, डॉ. देविराज पाटील, डॉ. किरण गोरे, डॉ. कालिदास दौंडकर, डॉ. सागर सोमवंशी यांच्यासह असोशिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.