ठाणे : उन्हाळ्यात ‘पाणी वाचवा जीवन वाचवा‘ या मोहीमेतून घोडबंदर रोठ ठाणे येथे पक्षांसाठी पिण्यासाठी पाणीठेवण्यात आले. एक हात मदतीचा सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकी जपत असे उपक्रम राबवीत असते.
दोन ते तीन महिने पाणी ठेवलं तर उन्हाळ्यात तहानलेल्या पक्षांचा जीव वाचू शकतो म्हणून संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीहा उपक्रम राबवण्यात येत आहे. संस्थेमार्फत सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, उस्मानाबाद, रायगड, ठाणे, कर्नाटक या ठिकाणी पक्षांसाठी पाणी ठेवण्यात येणार आहे.
यावेळी समाजसेवक चेतन चाळके, समाजसेवक भावेश शुक्ला उपस्थित होते.