पिंपरी चिंचवड : तृतीयपंथीयांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने बस – मेट्रो राईड उपक्रम आयोजित केला. सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तृतीपंथीयांना मोफत निगडी बस स्टँड पासून पिंपरी मेट्रो स्टेशन व पिंपरी स्टेशन ते फुगेवाडी व परतीचा प्रवास करण्यात आला.
यावेळी मेट्रो कडून तृतीयपंथीयांना मेट्रो प्रकल्पाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच स्मार्ट सिटीकडून मोबाईल ऍपबद्दल माहिती दिली. ऍप मध्ये विविध सेवांमध्ये, स्पर्धेत Gender निवडताना Male, Female आणि Transgender असे तीनही पर्याय आहेत याचा आवर्जुन उल्लेख असून डिजीटल माध्यमातून सामाजिक समरसता साधण्याचा प्रयत्न केला आहे. तृतीपंथीयांसाठी पिंपरी चिंचवड महापालिका उत्कृष्ट उपक्रम राबवित असून सामाजिक बदल होण्यासाठी खूप मोठे पाऊल उचललेले आहे.
महानगरपालिका आयुक्त व प्रशासक राजेश पाटील, उपआयुक्त अजय चाठणकर यांच्या पुढाकाराने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमात तृतीयपंथी, समाजविकास अधिकारी सुहास बहाद्दरपूरे, स्मार्ट सिटीचे अमोल देशपांडे, मेट्रोचे अधिकारी, आशा भट्ट, अध्यक्षा मंतृतीयांशथन फाउंडेशन व इतर सामाजिक संस्था उपस्थित होत्या.