बारामती : युवा चेतना सामाजिक संस्था व ऍड. विशाल मापटे यांच्या वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्य आणि मिठाई वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळेगाव बुद्रुक येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व देणगीदार यांच्या मदतीने ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.