सांगली : नमराह फाऊंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने १०वी-१२वी च्या विद्यार्थी आणि पालकांसाठी ‘शिक्षणाच्या विविध वाटा’ आणि होणारा संभ्रम या विषयवार एकदिवसीय सत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
यावेळी वालचंद कॉलेजचे माजी लायब्ररीयन व प्रख्यात शिक्षण तज्ञ डॉ. एस. ए. एन. इनामदार व डॉ. मुजाहिद इनामदार यांचे मार्गदर्शन लाभले. भविष्यकाळात असे विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातील असे यावेळी संयोजकांकडून जाहीर करण्यात आले.