नवी मुंबई : नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या विशेष सहकार्याने वाशी सिडको आवारात वृक्षारोपण करण्यात आले. फक्त वृक्षारोपण करून नाही तर त्या रोपांची काळजी घेण्याचे आश्वासन यावेळी फाऊंडेशन आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी दिले.
दशरथ (नाना) सीताराम भगत यांच्या मार्गदर्शनातून झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ.एल.व्ही. गवळी, युवा नेते निशांत भगत, समाजसेवक संदीप भगत व NMSYF टिम तसेच NSS स्वयंसेवक उपस्थित होते.