कोल्हापूर : भारताचे थोर क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त मिरजकर तिकटी, कोल्हापूर येथील हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीने प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चेतन नरके यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन केले.
“तुम मुझे खुन दो, मै तुम्ही आजादी दूंगा” अशी घोषणा देऊन स्वातंत्र्यचळवळ पुढे घेऊन जाणाऱ्या नेताजींच्या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला. तसेच सध्याचे नवीन लोकनियुक्त सरपंच व सदस्य यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. उमेदवारांनी निवडून आल्यावर आपापला पक्ष बाजूला ठेऊन सर्वच घटकांच्या विकासासाठी झटले पाहिजे, असे मत नरके यांनी व्यक्त केले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, चाटे शिक्षण समूहाचे संचालक भरत खराटे, इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.