मुंबई-नेरुळ : पोलीस बांधवांना त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी व ते करत असलेल्या कार्यासाठी जयश्री फाउंडेशनच्या वतीने नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये ऑक्सीजन रोपट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस बांधवांनी जयश्री फाऊंडेशनच्या कामाचे कौतुक करून आभार मानले.
या प्रसंगी जयश्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वैभव जाधव, साहिल कळंत्रे ,स्वप्नील म्हात्रे, निखिल चौरसिया, राज पाटील, शुभम जाधव, संदेश शिर्के, जयेश चेंडके उपस्थित होते.