सातारा : पंचायतराज दिनानिमित्त भैरवनाथ मंदिर, मेढा येथे बालसभेचे आयोजन करण्यात आले. अनुभव शिक्षा केंद्र सातारा, राष्ट्र सेवा दल शाखा मेढा व मायरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले. बालसभेचे उद्घाटन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.
उद्घाटक शिंदे म्हणाले, राष्ट्र सेवा दल मेढा शाखा, अनुभव शिक्षा केंद्र, सातारा व मायरा फाउंडेशन यांनी या उपक्रमासाठी आज मेढा गावाची निवड केली, याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. मुलांच्या विकासासाठी”बालसभा” महत्वाचा उपक्रम असल्याने लहान वयात मुलांना शिक्षणाबरोबर इतर आवश्यक गोष्टींचा अनुभव या उपक्रमामुळे मिळेल, शिक्षणाबरोबर, मुलांना आपले हक्क कर्तव्य व जबाबदारी चे इतर अनुभव देण्याचा हा प्रयत्न, आमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे.
यावेळी बालपंचायत समितीची निवड करण्यात आली. बाल सभेची गरज, प्रक्रिया, बालसभेचे व्यवस्थापन, सभासद निवड प्रक्रिया, त्याची कामे आणि कमिटीचे महत्व याची माहिती स्वप्नील मानव, सरस्वती शिंदे यांनी बालकांना दिली. मुलांनी हिरहिरीने सहभाग घेतला. मुलांना या कमिटीमध्ये सहभागी करून घेण्यात आले, आणि त्यांची निवड करण्यात आली एक सुंदर अनुभव, प्रत्यक्ष कृती शिक्षण मुलांना या बालसभेच्या निमित्ताने देण्यात आले.
या बलसभेला बाल संरक्षण अधिकारी अमोल माने, मेढा पोलीस ठाणे यांचे वतीने कर्मचारी बाबर, पांडुरंग जवळ नगराध्यक्ष, नगरपंचायत मेढा यांनी बाल सभेला भेट दिली. ग्रामस्थ म्हणून शशिकांत कदम माजी संचालक महात्मा गांधी वाचनालय मेढा यांची उपस्थिती होती. जितेंद्र सागर, सुलोचना कदम, वंदना गुरव, माया जवळ, शिल्पा देशमुख त्याचबरोबर महात्मा गांधी वाचनालयाच्या मगरे, कदम, यांची पालक म्हणून उपस्थिती होती, या सर्वांच्या उपस्बाथितीत बालसभा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस्वती शिंदे यांनी केले तर आभार जयश्री माजगावकर यांनी मानले. ही बालसभा संपन्न होण्यासाठी गावातील युवकांनी महत्वाचा सहभाग घेतला.