मुंबई : परिसराला नेहमी स्वच्छ ठेवणारे पर्यावरण रक्षक सफाई कामगार आणि कचरा वेचकांचा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाकर फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, वार्ड क्र. ६० येथे भगतसिंग नगर नंबर, १ व २ नया नगर, इंदिरा नगर मधील सफाई कामगारांचा बालसभेतील सदस्यांनी तयार केलेले धन्यवाद ग्रीटिंग कार्ड व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी भाकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक सोनावणे, सुमित जगताप, मंगला कुमठे, जाहिदा शेख, संगिता बोराडे, प्रशांत चव्हाण, प्राची टकले, उर्मिला टकले, नुपूर लांडगे, साहिल पोटे आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.