तारा मोबाईल क्रेशेस, पुणे संथेच्या वतीने बांधकाम साईट वरील मुलांच्या हक्कांसंदर्भातील मागण्या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित बांधकाम साईट वरील मुलांनी आरोग्य, संरक्षण, शिक्षण, मनोरंजन या संदर्भात काही मागण्या केल्या.
बांधकाम साईटवरील मुलांनी केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे.
आरोग्या संदर्भातील मागण्या
• साईट वर मुलांसाठी दवाखाना असला पाहीजे.
• मुलांना स्वच्छ पाणी आणि पोषक आहार मिळावा.
• घर आणि कम्युनिटी स्वच्छ असली पाहिजे.
• सर्व मुलांचे वयाप्रमाणे लसीकरण साईटवरच व्हावे.
• गरोदर माता तपासणी आणि लसीकरण साईट वर व्हावे, तसेच यांना पोषक आहार मिळावा.
• शौचालय स्वच्छ व मुलांसाठी सुरक्षित असली पाहिजेत.
• खेळण्यासाठी शारीरिक ताकदिसाठी मैदाने. असावीत व खेळाची साधन सामग्री असावी.
• मलखांब, योगा अशा तऱ्हेचे शारीरिक क्षमता वाढवणारे खेळांची सुविधा लेबर कॅम्प मध्ये असावी.
• घरांसमोर ओला सुका कचरा करण्यासाठी वेगळे डस्टबिन असावेत आणि कचरा वेगळा टाकण्याची सोय असावी.
• पिण्याची आणि वापरण्याच्या पाण्याची टाकी सतत साफ असावी.
मुलांच्या संरक्षणा संदर्भातील मागण्या
• लेबर कॅम्पला कम्पाउंड असावे.
• लेबर कॅम्प मध्ये आणि परिसरात पत्रे, सळई, लोखंडी वस्तू नसाव्यात वावरण्यासाठी सपाट जागा असावी.
• लेबर कॅम्प शेजारी लहान मुलांचा आणि जागेचा विचार करता गाडी लावण्यासाठी वेगळ्या ठिकाणी पार्किंग ची सोय असावी
• लेबर कॅम्प साईट वरिल बांधकामापेक्षा वेगळ्या ठिकाणी असले पाहिजेत.
• वेळोवेळी कीटक नाशकांची फवारणी झाली पाहिजे.
• घरांची व्यवस्था आणि बांधणी उन वारा पाऊस यांचा विचारकरता मजबूत असली पाहिजेत.
• लेबर कॅम्प मध्ये दारूचे दुकान नसावे.
• साईट वरिल मुलांना बाल कामगार, बाल लैंगिक बाल लैंगिक शोषण, बालविवाह, सायबर क्राईम याविषयी माहिती आणि जागृती व्हावी आणि लेबर कॅम्प मुलांसाठी सुरक्षित असावा.
• साईट वरिल मुलांसाठी बाल सुरक्षा धोरण असावे आणि साईट वर बाल सुरक्षा अधिकारी असावेत
• साईट वर अम्ब्युलन्स, आग विझवण्याची व्यवस्था, इलेकटरीसिटी चेकिंग व्हावे.
शिक्षणासंदर्भातील मागण्या
• लेबर कॅम्प मध्ये वाचनालय असावे.
• शाळेत जायला वाहनाची सुविधा असावी.
• लेबर कॅम्प मध्ये २४ तास लाईट असावी जेणेकरून अभ्यास करण्यासाठी मदत होईल.
• शाळेत खूप वाट बघायला न लावता लवकरात लवकर एडमिशन व्हावे.
• अभ्यास केंद्र असावे.
• कॉम्पुटर प्रशिक्षण केंद्र असावे.
मनोरंजना संदर्भातील मागण्या
• लेबर कॅम्प मध्ये मनोरंजन केंद्र असावे.
• मुलांसाठी डान्स, चित्रकला, संगीत असे क्लासेस असावेत.
इतर मुद्दे
• प्रत्येक साईट वर पाळणाघर असावे जेणेकरून मुलांचे संरक्षण होईल.
• लेबर कॅम्प मध्ये किरना दुकान असावे.