बीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था बार्टी पुणे मान्यता प्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बीड येथून आतापर्यंत तब्ब्ल ६५ विद्यार्थी शासकीय, निमशासकीय सेवेत झाले रुजू आहेत. बार्टीने उपलब्ध करुन दिलेल्या मोफत स्पर्धा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकातून समाधान व्यक्त होत आहे.
बीड येथील सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामुळे बीड जिल्हातील अनुसूचित प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना बँक, रेल्वे, एलआयसी व तत्सम स्पर्धा परीक्षा भरतीपूर्व प्रशिक्षण मिळाले. एवढेच नव्हे तर पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण मोफत मिळत असल्याने विद्यार्थ्यांना त्याच आणखीनच फायदा झाला.
बीड केंद्रातून आतापर्यंत ३८५ विद्यार्थी आणि १६५ विद्यार्थींनी असे मिळून ५५० विद्यार्थीनींना बार्टीच्या मोफत स्पर्धा प्रशिक्षणाचा फायदा मिळाला. त्यासाठी त्यांना १ कोटी ११ लाख विद्यावेतन तर पुस्तके २४ लाख ५० हजार असे एकूण १ कोटी ३५ लाख ५० हजार रुपये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बार्टीने पाच वर्षात उपलब्ध करून दिले. संस्थेचे संचालक राहुल वाघमारे यांनी बीड केंद्रात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि सर्व सुविधायुक्त मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थी नोकरीस लागण्याचे प्रमाण अधिक आहे.
आम्ही सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थी घडवितो
सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून आम्ही अनुसूचित जातींच्या विद्यार्थांना घडविण्याबरोबरच ओपन आणि ओबीसी विद्यार्थ्यांना देखील संस्थेने मोफत शिकविले आहे. त्यामुळे या केंद्रातून एकूण ७ विद्यार्थी शासकीय विभागात विविध पदावर कार्यरत आहेत. त्याचे आम्हाला आत्मिक समाधान आहे. यापुढे देखील संस्थेची हा सामाजिक बांधिलकी कायम अशीच विद्यार्थी घडवीत राहिल. असा विस्वास संस्थेचे संचालक राहुल वाघमारे यांनी व्यक्त केला.
नियोजनाच्या भूमिकेतून कौतुकच
बार्टीमध्ये स्पर्धा परीक्षांचे भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वी ४ महिन्यांचे प्रशिक्षण व ३ हजारांची शिष्यवृत्ती व ३ हजारांची पुस्तके देण्यात येत होती. मात्र धम्मज्योजी गजभिये यांच्याकडे बार्टीच्या महासंचालक पदाची सूत्रे आल्यापासून यात मोठा बदल झाला, आणि या बदलाचा विद्यार्थ्यांना अधिक फायदा मिळाला. त्यामुळे प्रशिक्षण कालावधी ६ महिने तर शिष्यवृत्ती ६ हजार रुपये व पुस्तके ५ हजारांची देण्यात येऊ लागले आहे. तसेच पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण यांच्याच काळात सुरु करण्यात आले आहे. एकंदरीत धम्मज्योजी गजभिये यांच्यामुळे बार्टीचे रुपडे पालटले आहे.