पुणे : आर्क युवकांची पुणे विभागीय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये बालमजुरी विषयावर CACL या राज्यस्तरीय मोहिमेमध्ये बालमजुरीचे प्रश्न मांडण्यासाठी विभागातून दिव्या चव्हाण व विनोद गुंजवटे या दोन मुलांची निवड करण्यात आली. बैठकीमध्ये विविध वस्त्यांमधील २७ मुलांनी सहभाग घेतला होता.
मुलांनी लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवुन सदर निवड केली. यामध्ये १८ वर्षाखालील ७ मुले निवडणुकीसाठीउभे राहिले होते. यामध्ये २७ मुलांनी मतदान केले. उमेदवार मुला-मुलींनी आजूबाजूला दिसणारे बालमजुरीचे प्रकार, बाल मजुरीमुळे मुलांचे होणारे नुकसान, आणि त्यावर करता येतील असे उपाय, यावर आपली मते मांडली. एक मुलगी आणि एक मुलगा प्रतिनिधी अशा प्रकारे प्रत्येकांनी दोन मते देऊन हि निवडणूक प्रक्रिया पार पाडली.







