पिंपरी चिंचवड : राष्ट्रीय बालमजूरी विरोधी दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात जनजागृती मोहीम अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने चिंचवड स्टेशन चौक येथे बालमजुरी विरोधात पेन्सिल पोर्टल स्टीकर वितरण, माहितीपत्रक वाटप तसेच बालमजुरी विषयावर चित्रकला उपक्रम घेऊन जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाने विशेष सहकार्य केले.