मुंबई (गोरेगाव): भाकर फाऊंडेशनच्या वतीने बाल अधिकार सप्ताह निमित्त दिनांक १४ ते २० नोव्हेंबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. सदर कार्यक्रम भगतसिंग नगर नंबर १,२ गोरेगाव पश्चिम येथे होणार आहेत. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक सोनावणे यांनी दिली आहे.
१४ ते २० नोव्हेंबर कार्यक्रम पुढीलप्रमाणे
१. १४ नोव्हेंबर – बाल दिन रंगोत्सव
२. १५ नोव्हेंबर – अंगणवाडी सेविकांस बाल अधिकार व संरक्षण माहिती सत्र
३. १६ नोव्हेंबर – पालकांशी बाल संरक्षणावर खुला संवाद
४. १७ नोव्हेंबर – बाल संरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय व लोकप्रतिनिधींशी संवाद
५. १८ नोव्हेंबर – विद्यार्थ्यांसोबत “बाल अधिकार व बाल संरक्षण” विषयक संवाद
६. १९ नोव्हेंबर – बालकांची पोलिस ठाण्यात सहल
७. २० नोव्हेंबर – निर्भय रॅली (बाल अधिकार दिन)