मुंबई : भाकर फाऊंडेशन आयोजित बाल अधिकार सप्ताह मार्फत मुलांसाठी पोषक सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे तसेच मुलांच्या समस्या गोरेगावच्या प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या व राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर याव्यात यासाठी भाकर टिमने गोरेगावातील वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींशी व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांची भेट घेऊन मुलांसाठी पोषक, सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी निवेदन दिले.
खरतर मुले मतदान करत नाही म्हणून आपण सर्व मुलांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आलो आहे पण, मुले सुद्धा या देशाचे नागरिक आहेत आणि त्यांचा समस्यांच्या मुद्द्यांवर काम करणे हि आपली प्राथमिक जबाबदारी असल्याने मुलांचे मुद्दे राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर यायला हवेत यासाठी गोरेगावातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेण्यात आली. असे भाकर फाउंडेशनचे सोनावणे यांनी सांगितले.
या भेटी दरम्यान भाकर फाऊंडेशन अध्यक्ष दिपक सोनावणे, विद्या कांबळे, आकाश क्षिरसागर, करूणा सोनावळे, मयुर जाधव, प्रिया सह, ज्ञानेश्वर लोंढे, मानसी आचरेकर, कुणाल शिंदे, विवेक कुडेकर, बजरंग बाविशे, अजय भालेराव, मुकेश उपस्थित होते.