पुणे : बुद्ध पौर्णिमेनिमित्त मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने ‘व्यसनाधीनता’ या विषयावर चित्रकला मेळावा आयोजित करण्यात आला होता. नागपूर चाळ येथील लुंबिनी उद्यानात झालेल्या या कार्यक्रमात पाटील इस्टेट, नागपूर चाळ/हौसिंग बोर्ड व गांधीनगर, जयप्रकाश नगर या वस्त्यांमधून ५५ मुलांनी तर मॉडर्न महाविद्यालय, गणेश खिंडच्या २० मुलांनी इंटर्नशिप म्हणून या कार्यक्रमात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला सहभागी मुलांचे कौतुक करण्यासाठी माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी, बुद्धांचे पंचशील तत्व आणि त्या तत्वांपैकी, व्यसन न करणे हे एक तत्व आहे आणि या तत्त्वाचे पालन मनोदय संस्थेच्या वतीने केले जात आहे. असे म्हणत संस्थेच्या कामाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले, समुपदेशक अक्षय कदम, कार्यक्रमाचे समन्वयक मैत्रेयी पाध्ये आणि प्रज्ञा जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.