मुंबई : भाकर फाऊंडेशनच्या कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ग्रंथालय आणि बिनधास्त बोल समुपदेशन केंद्राचा उद्घाटन सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला. गोरेगाव पश्चिम, भगतसिंग नगर येथील या कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन माधुरी चिटणीस, बिनधास्त बोल समुपदेशन केंद्राचे उद्घाटन आमदार कपिल पाटील आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ग्रंथालयाचे उद्घाटन प्रा. डॉ वैजयंता आनंद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दोन वर्ष सातत्याने भाकर फाऊंडेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांना कार्यानुभव प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक सोनावणे, समाजवादी नेते, अरविंद सावला, राष्ट्रवादीचे नेते नौशाद शिकलगार, मोतीलाल नगर विकास समितीचे सचिव निलेश प्रभु, सुखदेव कारंडे, महाराष्ट्र विद्यालयाचे सचिव शशांक कामत, युवा पॉवरचे संपादक अमोल निकाळजे आदर्श निकाळजे, नशा बंदी मंडळाचे वर्षा विद्या विलास, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यावेळी भाकर फाऊंडेशन सेंटरला भेट दिली.
तसेच दिवसरात्र एक करून या सेंटरला निर्माण करण्याचे कार्य मंगला कुमठे, आकाश क्षिरसागर, जाहिदा शेख, प्रशांत चव्हाण, मयुर जाधव, मानसी आचरेकर, अजय भालेराव, दिपक भालेराव, श्रवण खंडागळे, जॉयल डिसुझा, नुपूर लांडगे, रितीक अडांगळे, रितिक सकपाळ, माधव डिगंकर, स्नेहल गवळे, अशा अनेक कार्यकर्त्यांनी केले.







