पुणे | मंथन फाऊंडेशनच्या आत्तापर्यंत केलेल्या कामाच्या लघु माहिती पत्रकाचे अनावरण महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते १० आक्टोबर रोजी राजभवन येथे करण्यात आले.
मंथन फाऊंडेशन वेश्या व्यवसाय करत असणाऱ्या महिलांसाठी, तृतीपंथीसाठी, स्थलांतरित कामगार, ट्रक ड्रायव्हर व एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तींसाठी खूप महत्वपूर्ण कार्य करत आहेत. समाजातील वंचित घटकांसाठी काम करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंथन फाऊंडेशन खूप मोलाचे योगदान करत आहे असे कौतुक राज्यपाल यांनी केले.
यावेळी मंथन फाऊंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट, फाऊंडेशनचे कार्यकर्ते ऐश्वर्या खोत, सूरज भट्ट , देवेंद्र ढेक व दीपक निकम उपस्थित होते.