• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, February 9, 2026
NGO खबर
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Monday, February 9, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

मंदिर, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा, बुद्धविहार येथे संविधान दिन साजरा

NGO ख़बर by NGO ख़बर
December 13, 2021
in सामाजिक उपक्रम
0

पिंपरी चिंचवड : समता सैनिक दलाच्या वतीने संविधान दिना निमित्त मंदिर, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा, बुद्धविहार येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात Our Lady church, Pimpri येथे सकाळी ७ वाजता प्रार्थनेच्या वेळी करण्यात आली. फादर आमृत यांच्या आदेशाने फादर जेम्सन यांनी प्रार्थनेनंतर प्रास्ताविकेचे वाचन व न्याय, समता, बंधूता व स्वातंत्र्य यावर प्रवचन दिले. १०:३० वाजता डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे संविधान निर्माते डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना सलामीरूपी अभिवादन करून धर्मगुरूंच्या हस्ते प्रास्ताविकेचे पठन करण्यातआले.

अभिवादन झाल्यानंतर दुपारी १२: ३० वाजता तीर्थक्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली आळंदी देवाची येथील ह.भ.प सुभाष गिरठे महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराज ७२५ वा समाधी सोहळा दिवस आहे आणि संतांचे सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांप्रमाणेच कार्य आहे. लोकांना जागृत करणे तसेच संविधानीक मुल्यांचा प्रसार प्रचार तळागाळापर्यंत झाला पाहिजे असे मत व्यक्त करून उपस्थित भाविकांना व समस्त भारतीयांना मंगलमय सदिच्छा दिल्या. त्यानंतर  जुम्मैकी नमाजला जामा मस्जिद खराळवाडी येथे दुपारी  १:३० वाजता मौलाना – अयुब इनामदार यांनी बयानच्या वेळेस संविधानाचे  महत्व व प्रत्येक नागरीकांनी त्याचे  काटेकोरपणे पालन केले पाहिजे व संविधान कसे आपल्या रोजच्या जिवनाशी निगडीत आहे ते उदाहरणासहीत स्पष्टीकरण देऊन उपस्थित नागरीकांना समजावुन सांगितले व नमाज नंतर प्रास्ताविकेच पठन करण्यात आले.

यानंतर इस्कॅान टेम्पल रावेत येथे सायंकाळी ५:३० वाजता प्रभू जगदिश यांनी संविधानातील  मुलभूत अधिकार व कर्तव्ये यांवर आपले मनोगत व्यक्त केले तसेच संविधानाच्या प्रसार व प्रचाराची जबाबदारी भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरीकाची आहे व त्यांचे ते नैतिक कर्तव्ये असले पाहीजे असे मत व्यक्त करून संविधानाच्या प्रसार व प्रसारासाठी योगदान देवू असे आश्वासन दिले. सायंकाळी ७:३० वाजता गुरूनानक दरबार पिंपरी येथे ग्रंथी सुरजीत सिंग यांनी गुरूवाणीमधून गुरूनानकांचे समतेचे विचार मांडले व संविधानामुळेच आपण सर्व गुन्यागोविंदाने राहू शकतो याची भाविकांना जानीव करून दिली व समता सैनिक दलाच्या कार्याला शुभेच्छा देऊन आम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ अशी इच्छा व्यक्त केली व त्याच बरोबर प्रधान अदियाल यांनी संविधान दिनानिमित्त  सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचा शेवट औंध रोड शाखेने संविधान रॅली काढून व स्वारगेट शाखेने बालाजी नगर धनकवडी येथे अंजूनन ए इनामीया मस्जिद चे मौलाना आशिफ खान यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले व उपस्थितांना मार्गदर्शन करून मोठ्या जल्लोषात संविधान दिन साजरा करण्यात  आला. यावेळी सर्व नियोजित स्थळी २६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व निष्पाप नागरीकांना आदरांजली वाहन्यात आली.

Previous Post

एका रात्रीत २२४ गरजूंच्या अंगावर प्रत्यक्ष पांघरून घालून युवकांनी केली सेवा

Next Post

कृषी विज्ञान मंडळ संस्थेच्या वतीने विविध मागण्यांसाठी लोकप्रतिनिधींना निवेदन

Please login to join discussion

Categories

  • Business, Small Business (1)
  • CSR (83)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (262)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (119)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)

2

NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved