पुणे : मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने गांधीनगर,जयप्रकाश नगर येथे पथनाट्य व पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते संतोष सुकाळे व जय गणेश प्रतिष्ठान गांधी नगर यांच्या सहकार्याने मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे तिसरे केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले.
या निमित्ताने वस्तीमध्ये व्यसनाधीनता विषयी जाणीव जागृतीसाठी सहा ठिकाणी पथनाट्य व पोस्टर प्रदर्शन आयोजित केले होते. संस्थेच्या वतीने व्यक्तिगत व गट समुपदेशन, अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस नियमित बैठका, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पौगंडावस्थेतील तरुणाईचे मानसिक, शारीरिक, सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी विविध कृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.