पुणे : भेकराई माता महिला सखी मंच व बालाजी सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त मोफत फॅशन डिझाईन क्लासेस चे उद्घाटन करण्यात आले. संजय शेठ हरपळे जनसंपर्क कार्यालय भेकराईनगर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून परिमंडळ पाच च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, ग्रामीण महिला संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धीनी संजय जगताप, सामाजिक कार्यकर्त्या सोनल चेतन तुपे , माजी महापौर वैशाली ताई बनकर, नगरसेविका रुपाली ठोंबरे, पल्लवी सुरसे, संजय शेठ हरपळे, सुधाताई हरपळे व परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
या उपक्रमाबाबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी सुधाताई संजय हरपळे आणि संजय हरपळे यांचे कौतुक केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना नम्रता पाटील यांनी महिलांनी या सुरू केलेल्या तीन महिन्याच्या कोर्सचा लाभ घेऊन स्वबळावर उभे रहावे. अशा उपक्रमांचा लाभ घेऊन कर्तृत्व गाजवावे अशी महिलांना साद घातली. माजी महापौर वैशालीताई बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिला साठी हा एक चांगला उपक्रम आहे असे उपक्रम खूप कमी प्रमाणात राबविण्यात येतात परंतु संजय शेठ हरपळे व सुधाताई हरपळे यांच्या वतीने महिलांसाठी अनेक उपक्रम राबवताना आजवर मी पाहिले आहे. समाजातील महिला सक्षम व्हावी यासाठी हे दोघे नेहमी झटत असतात या उपक्रमातून प्रत्येक महिलेने शिकून सक्षम व्हावे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा असे महिलांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर भविष्यात आपण या दाम्पत्यांना अशीच साथ द्यावी असे आवाहन उपस्थती महिलांना केले. सोनल चेतन तुपे यांनी मनोगत व्यक्त करताना अशी सुवर्णसंधी तुमच्यासाठी घर चालून आली आहे तरी या संधीचं सोनं करून तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आधार व्हावे असे महिलांना सुचवले.
उपस्थित सर्वांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाताई हरपळे यांनी करताना भेकराई महीला सखी मंचच्या माध्यमातून आजवर महिलांसाठी बारा प्रकारचे मसाले बनवणे, केक तयार करणे, आरोग्य शिबिर, महिलांसाठी अष्टविनायक ट्रीप, मुलींसाठी लाठी काठी प्रशिक्षण, घेतले असल्याचे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. उपस्थितांचे आभार संजय शेठ हरपळे यांनी मानले.