फोटो क्रेडिट – हमारी पहचान फेसबुक पेज
नवी दिल्ली : महिलांच्या मासिक पाळी स्वच्छतेसाठी काम करणारी ‘हमारी पहचान’ एनजीओ विद्यार्थीनींसाठी मासिक पाळीबद्दल जागरूक करण्यासाठी मोहीम राबवत आहे. या मोहिमे अंतर्गत, विद्यार्थिनींना आणि वंचित महिलांना सॅनिटरी पॅड वाटप करून त्यांना मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेबद्दल प्रबोधन करून आवश्यक माहिती पोहोचविण्याचे काम करत आहे.
हमारी पहचान एनजीओचे संस्थापक तरुण माथूर आणि अंजली माथूर, प्रकल्प प्रमुख आरती वर्मा यांच्यासह, मासिक पाळीच्या समस्येवर काम करण्यासाठी स्वयंसेवकांची एक टीम तयार केली. मासिक पाळीबद्दल असणाऱ्या गैरसमजांवर आरती वर्मा यांनी सांगितले की, एनजीओच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक म्हणजे भारतातील महिला आणि मुलींमधील मासिक पाळीची स्वच्छता आणि मासिक पाळी यासंबंधीच्या गैरसमज यांना दूर करणे. या प्रकल्पावर काम करत असताना संस्थेने दिल्ली एनसीआरमध्ये विविध ठिकाणी सॅनिटरी पॅड वितरण मोहीम राबवली आहे. याशिवाय संस्थेने बेघर आणि वंचित महिलांना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप केले आहे.
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी, हमारी पहचान एनजीओ दरवर्षी विविध सेलिब्रिटी, पत्रकार आणि समाजातील नामवंत सदस्यांना या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित करत असते. तसेच लोकांना हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढे येण्यासाठी प्रेरित करते. संस्था महिलांसाठी वेळोवेळी योग्य मासिक पाळी स्वच्छता उत्पादने आणि किट उपलब्ध होत असल्याची खात्री करत असते.