पिंपरी चिंचवड : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने “मेन डिड फॉर ब्लीड” च्या वतीने किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्राचे आयोजन आण्णाभाऊ साठे नगर, निगडी येथील अंगणवाडी मध्ये करण्यात आले होते.
या सत्रात मासिक पाळी आणि त्या संदर्भात असणारे समज, गैरसमज, श्रद्दा अंधश्रद्धा, मासिक पाळी दरम्यान घेण्यात येणारी काळजी, आहार यावर सविस्तर मार्गदर्शन पुणे जिल्हाचे समन्वयक के. अभिजीत यांनी केले. तसेच यावेळी उपस्थित मुली आणि महिलांच्या मनात असणाऱ्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देण्यात आली.
या कार्यक्रमात समाजबंधचे शर्वरी आणि सचिन आशा सुभाष यांनी मासिक पाळीवर सहज सोप्या भाषेत लिहलेल्या “प – पाळीचा” या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. तर कार्यक्रमासाठी ज्योती लोधे यांचे विशेष सहकार्य मिळाले.











