वर्धा : वर्धा शहराच्या मध्यभागी असलेल्या आर्वी नाका वडार वस्ती फूटपाथ स्कूल हा स्तुप्त उपक्रम गेली पाच वर्षांपासून सुरू आहे. विद्यार्थ्यांना हक्काचा मंच मिळावा म्हणून दर वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रो. रजनीश कुमार शुक्ल कुलपती मा. गा. अ. हि. वि. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संत सयाजी महाराज विश्वशांती धाम, डॉ. अभ्युदय मेघे विशेष कार्यकारी अधिकारी सावंगी मेघे, नितेश कराळे खद फ्रेम मास्तर, सुधीर पांगुळ समाजसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रास्ताविक मोहित सहारे यांनी केले. ते म्हणाले, कार्यक्रम घेताना बऱ्याच अडचणी आल्या पण आमच्या सोबत उभे असणारे आणि ज्या लोकांनी आर्थिक सहकार्य केले त्या सर्वांमुळे हे सर्व करणे शक्य झाले. मंचावरून बोलताना कार्यक्रम अध्यक्ष प्रो.शुक्ल म्हणाले, फूटपाथ स्कूल मधून निघणार प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षण क्षेत्रात आपल्या पायाचा ठसा उमटवेल.
संत सयाजी महाराज म्हणाले, मोहितचे कार्य लोकांना विचार करायला लावणारे आहे. या कार्यात धनवान लोकांनी स्व:ईच्छेने मदत करावी. डॉ.मेघे म्हणाले कि, वंचितासाठी काम करणारे फार कमी आहेत पण ते जे करत आहेत आपण त्यांचा सोबत उभं राहिले पाहिजे. युवकांची पिढी समाजात काही बदल आणण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे आपण त्यांना जे शक्य होईल ते मदत केली पाहिजे. पुढे पांगुळ म्हणाले कि, थोर भले भले करू शकत नाही असे काम तुम्ही करत आहात असे म्हणून स्तुती केली तर, कराळे यांनी त्यांच्या वऱ्हाडी बोली भाषेतून आयोजकांचे कौतुक केले.
वर्धेत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अमोल इंगोले, चेतन बेले, नीरज बुटे, आशिष सोनटक्के, रुपाली बावणे, निहाल पांडे, नाट्य प्रतीक थेटर अकॅडमी, यारीया ग्रुप, ऍक्टिव्ह बडीज ग्रुप, शिवजयंती उत्सव समिती, डॉ. अन्वर सिद्दिकी, प्रणय ढोले, गजानन जाधव या समाज सेवकांचा सत्कार करण्यात आला. पुढे एकापेक्षा एक असे सुंदर सुंदर नृत्य विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केले. विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स व मॉडेलिंगमध्ये विजेत्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिलाष डाहुले,प्रतीक पवार,अंकित बारंगे, हर्षाली बोरसरे,वैष्णवी सहारे,नीता पोटदुखे, रोशन घागरे,आकाश जांभुळकर, शौनक गावंडे,प्रिया बारंगे,माधुरी नागतुरे,तिलोक वनकर,तन्मय मेश्राम,तेजस ठाकरे,वेदांत देशमुख, राहुल कठाने,लोकेश तेलरांधे,उन्नती डोंगरे,विकास ठाकरे,सलोनी उईके,तनया जगताप यांनी सहकार्य केले.











