परभणी : बचतगटाच्या सदस्यांच्या पाल्याने स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल पाल्यांचा व पालकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. एमपीएससीमधून असिस्टंट इंजिनिअर म्हणून जलसंपदा विभागात निवड झाल्याबद्दल राधिका देशमुख, रुपाली संवडकर, पंकज देशमुख यांचा मनपा आयुक्त तथा जिजाऊ संस्थानचे आजीव सदस्य देविदास पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. दहा वर्षांपूर्वी शहरात स्थापन झालेल्या राजमाता जिजाऊ बचतगटाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिजाऊ संस्थानाचे कोषाध्यक्ष अशोक रसाळ, सुशील देशमुख, अॅड. एम.पी.कुळकर्णी उपस्थित होते.
देविदास पवार यांनी यशस्वी अधिकार्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व परभणी येथील जिजाऊ मंदिराचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी उपस्थित सर्व सभासदांना आपपापल्या परीने या बांधकाम पूर्णत्वासाठी मदतीचे आवाहन केले. यावेळी दोन लाख रुपयांचा निधी जमा झाला.