महा एनजीओ फेडरेशन तर्फे सन्मान स्त्री शक्तीचा; उत्तुंग कर्त्वृत्वाचा ! कार्यक्रमात समाजात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांच्या उज्ज्वल कार्याचा सन्मान राजमाता जिजाऊ स्त्री सन्मान पुरस्काराने केला. आशाताई भट्ट वेलणकर यांचे एचआयव्ही एड्स कार्याबद्दल त्यांना हा सन्मान पद्मश्री राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महिलांच्या कार्याला सलाम म्हणून हे पुरस्कार दिले जातात. या सोहळ्यास बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि माजी आमदार मेधाताई कुलकर्णी, क्लीन सायन्स अँड टेक्नॉ. इंडियाचे कृष्णकुमार बूब, महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. मॉडेल कॉलनीतील माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या सभागृहात हे आयोजन करण्यात आले.







