कर्नाटक : शाळेमधील मुलांमध्ये हात धुण्याची सवय लागावी यासाठी वर्ल्ड व्हिजन इंडियाने कर्नाटकातील बेल्लारी येथील ८ सरकारी शाळेमध्ये साबण बँक (Soap Bank) सुरू केल्या आहेत. या उपक्रमाद्वारे गावातील लोकांना मुलांच्या स्वच्छतेसाठी या बँकेत साबण जमा करता येणार आहेत.
या सरकारी शाळांमध्ये हात धुण्याची केंद्रे आहेत. परंतु साबणांसारख्या स्वच्छता उत्पादनांच्या अभावामुळे मुलांना त्याचा फायदा होऊ शकला नाही. त्यामुळे दुपारचे जेवण करण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर साबणाने हात धुण्याची सवय मुलांना लागावी या उद्देशाने साबण बँकेची कल्पना जन्माला आली. साबण बँका शाळांमध्ये मुलांच्या क्लबद्वारे चालवल्या जातात जे त्यांच्याकडे वर्षभर पुरेसे साबण असल्याची खात्री करतील. या उपक्रमासाठी शिक्षकांपासून ते शाळा विकास व्यवस्थापन समिती सदस्य आणि ग्रामविकास समिती सदस्यांपर्यंत अनेकांनी पुढे येऊन साबण दान केले आहेत.