पुणे : प्रा. डॉ. एन.डी. पाटील पाटील वैज्ञानिक जाणीव प्रकल्प अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्काराचे सादरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय, कोंडणपूर, सिंहगड पायथा आणि जिल्हा परिषद शाळा, शिंदेवाडी येथे हा कार्यक्रम पार पडला.
विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणे व विद्यार्थी दशेतच वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रूजवीणे या मुख्य हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चमत्काराचे सादरीकरण व त्यामागील विज्ञान या विषयावर श्रीरंग मोहिते, गजानन बिराजदार, नंदू कांबळे तसेच नितीन अण्णा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.