आळंदी : ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर संचलित वारकरी संत विचार संस्कार शिबीराचे उद्घाटन देखण्या सोहळ्यात झाले. यावेळी वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.
वाकरी कीर्तनाच्या माध्यमातून शामसुंदर महाराज गेल्या अनेक वर्षांपासून विविध विषयांवर जनजागरण करीत असतात. त्यांच्या या अनुभवी मार्गदर्शनाखाली नवे कीर्तनकार तयार व्हावेत यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना विविध सामाजिक संघटनांचे पाठबळ लाभत आहे.
या उद्घाटन सोहळ्याला श्री संत कैकाडी महाराज यांचे वंशज मठाधिपती भारत महाराज जाधव, आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त दिनकर शास्त्री भुकेले, संत ज्ञानेश्वर माऊली दिंडी सोहळ्याचा चोपदार राजाभाऊ महाराज, संविधान अभ्यासक व राष्ट्र सेवादलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष वारे, संत साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार श्रीरंग गायकवाड, जेष्ठ राष्ट्र सेवा दल सैनिक रावसाहेब अण्णा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.