सोलापूर : ज्ञानज्योती माता सावित्रीमाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्ताने संभव फाऊंडेशन कडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन सावित्री उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या शिवाई शेळके संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण, रा.स.चंडक हायस्कूलचे जयंत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
रा.स.चंडक हायस्कूल येथील इ.९वी आणि इ.१० वीत शिकणाऱ्या ३० विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्त्या शिवाई शेळके यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर सेवक कर्मचाऱ्यांचे तसेच संभव फाऊंडेशनच्या सचिव राणी सिरसट, कार्याध्यक्षआस्मिता गायकवाड, आकाश बनसोडे, विश्वजित बनसोडे, आमिर दंडोती, राहुल सिरसट, गौतम गवळी, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. डॉ. सिद्धार्थ तळभंडारे यांनी केले.