बीड : किल्ले धारुर शहरातील कसबा विभागातील शिवगर्जना गणेश मंडळाच्या वतीने यावर्षी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दहा दिवसात गणेशोत्सवानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मंडळाच्या वतीने यापूर्वी दोन रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार मंडळाच्या वतीने रक्तदान व कोविड बुस्टर डोस शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मंडळाच्या लसीकरण शिबिराचे उद्घाटक पोलिस उपनिरीक्षक विजय आटोळे, ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन, जेष्ठ पत्रकार प्रकाश काळे, पत्रकार सुनिल कावळे, पत्रकार सचिन थोरात, पत्रकार अतुल शिनगारे, नारायण कुरुंद, विठ्ठल दादा शिनगारे, विनायकराव ढगे, संजय भाऊ शिनगारे, अॅड.परमेश्वर शिनगारे, सुधिर शिनगारे, विनायक शिनगारे, अभिजित शिनगारे, तुकाराम शिनगारे, संदिप शिनगारे, गणेश शिनगारे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
शिवगर्जना गणेश मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३१ रक्तदात्यांनी उस्फुर्तपणे रक्तदान केले व २५ जणांनी कोविड बुस्टर डोस घेतला. गणेश मंडळाच्या शिबिरात रक्तदान करत सामाजिक कार्यात सहभाग घेतला याचा आनंद झाल्याच्या प्रतिक्रिया रक्तदात्यांनी यानिमित्ताने दिल्या.
रक्तदान शिबिर व बुस्टर डोस शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवगर्जना गणेश मंडळाचे अध्यक्ष शरद शिनगारे, प्रशांत शिनगारे, धनंजय रेपे, नागेश शिनगारे, विश्वास शिनगारे, सचिन शिनगारे, सन्नी शिनगारे, निलेश शिनगारे, अमरजित शिनगारे, प्रतिक लांडगे, राजेश शिनगारे, अजित शिनगारे, आप्पाराव शिनगारे, धनंजय शिनगारे, मनोज शिनगारे, इंजि.जनक फुन्ने, धनंजय फुन्ने व इतर गणेश मंडळाचे सदस्यांनी सहभाग घेत रक्तदान शिबीर यशस्वी केले.