बार्शी : स्नेहग्राम व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने बार्शी तालुक्यातील गाडेगाव येथे उभारलेल्या अनुश्रीताई आनंद भिडे जलशुद्धीकरण प्लांटचे लोकार्पण स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष संजयभाऊ गुगळे व प्रिसिजन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधवदादा देशपांडे यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्नेहालय संस्थेचे वरिष्ठ संचालक अनिलभाऊ गावडे हे होते. यावेळी संजयभाऊ गुगळे व माधवजी देशपांडे यांनी शुद्ध पाण्याचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्व सांगितले. तसेच सहा. पो. निरीक्षक शिवाजी जायपत्रे, आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रास्ताविक राहुल भालके यांनी केले.
याप्रसंगी बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, उद्योगपती प्रशांतजी पैकेकर, बार्शी जनता टाइम्सचे संपादक संतोषदादा सूर्यवंशी, दै. पुढारी वृत्तपत्राचे प्रतिनिधी गणेशभाऊ गोडसे, उपसरपंच श्री. धोंडीराम नागणे, जेष्ठ साहित्यिक शब्बीर मुलांनी सर, पिंटूभाऊ नाईकवाडी, बार्शी टाइम्सचे दिनेशजी मेटकरी व अपर्णाताई दळवी, बाबासाहेब शेख, चंद्रकांतजी पाटील, जयवंतराव पाटील, नागनाथ पाटील, सुरेश जाधव सर, पोलीस कर्मचारी समीर भाई पठाण, ग्रामसेवक, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते.
गाडेगाव येथील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त मिरवणूक व इतर अनावश्यक खर्च टाळून जमा वर्गणीतून ग्रामस्थांसाठी जलशुद्धीकरण प्लांट उभारण्याचे ठरवले. त्यानुसार प्लांटच्या एकूण रक्कमेपैकी ४० टक्के रक्कम वर्गणीतून जमा केली व उर्वरित ६० टक्के रक्कम स्नेहग्रामने दिली. त्यानुसार सुमारे १ लाख १५ हजार किमतीचा २५० लिटरचा कॉइन व प्रीपेड रिचार्ज बेस R.O. बसवून त्याचा लोकार्पण करण्यात आले. यासाठी स्नेहग्रामने पुढाकार घेऊन ठाण्यातील निवृत्त बँक अधिकारी अनुश्रीताई आनंद भिडे यांनी स्नेहग्रामच्या वतीने ६० टक्के सहभाग रक्कम दिली.
यासाठी भिडे कुटुंबीय व स्वराज्य प्रतिष्ठानचे यावेळी खूप आभार. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश नागणे, गजानन बोराडे, प्रमोद जाधव, मनोज काळे, संतोष भालके व सागर जगताप यांनी परिश्रम घेतले.