अहमदनगर ( कोपरगाव ) : संजीवनी युवा प्रतिष्ठाच्या वतीने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मणिशंकर आय हॉस्पिटल, नाशिक यांच्या मदतीने कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
कोळपेवाडीतील महेश्वर मंदिर सामाजिक सभागृहात झालेल्या नेत्र तपासणी शिबिरात कुंभारी, माहेगांव देश, कोळपेवाडी, मुर्शतपुर फाटा, धारणगांव, शहाजापूर, मढी बु., जे. पाटोदा, वेळापूर, सुरेशगाव या गावांमधील नागरिकांनी लाभ घेतला.
याप्रसंगी निवृत्ती पा. कोळपे, आप्पासाहेब दवंगे, सोपानराव पानगव्हाणे, राजेंद्र पा. कोळपे, शिवाजीराव कदम, बाळासाहेब पानगव्हाणे, पुंजाजी पा. राऊत, शब्बीर भाई शेख, आदी उपस्थित होते.