संविधान दिनाचे औचित्य साधुन आभा परिवर्तनवादी संस्थेच्या “जागर संविधानाचा” या उपक्रमाची सुरवात झाली. या उपक्रमांतर्गत डिजिटल स्वरूपात व्हिडिओच्या माध्यमातून आणि व्याख्यानांच्या माध्यमातून संविधान सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.
यानिमित्ताने गोरेगाव येथील मोतीलाल नगर न्यू सेकंडरी स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संविधानाचा जागर करण्यात आला. हे व्याख्यान फक्त विद्यार्थ्यांसाठी नसून सर्व वयाच्या समाजघटकांसाठी आहे. व्याख्यान आयोजित करायचे असल्यास आभा संस्थेशी संपर्क करण्यात यावा असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
संविधान संवादक रोचना विद्या हिने हे व्याख्यान दिले. सोबत आभाचा कार्यकर्ता तेजस होरंबे उपस्थित होता. व्याख्यानाचे आयोजन भाकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक सोनवणे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.







