सांगली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगलीच्या महिला टीमने मिरज येथील एका भगिनीच्या जटा काढून तिला जटेच्या त्रासापासून मुक्त केले. सावित्रीमाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे साक्षीने हे जट निर्मूलन अंनिस कार्यालयात करण्यात आले.
जटा सोडविण्याचे काम सांगली अंनिसच्या महिला कार्यकर्त्या डॉ. सविता अक्कोळे, आशा धनाले, धनश्री साळुंखे, गीता ठाकर, त्रिशला शहा यांनी केले. या महिलेचे समुपदेशन अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी केले.
आपल्या परिचयातील कोणाला जटा असतील किंवा ज्यांना कुणाला जटा काढायच्या असतील त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे, फारुक गवंडी यांनी केले आहे.