स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साताऱ्यातील आकाशवाणी आणि मतकर झोपडपट्टी मधील ७५ विद्यार्थांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून युवाग्राम संस्थेने सामाजिक उपक्रम राबवला.
सातारा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त युवा ग्रामविकास सामाजिक सेवा संस्था आणि सेवा सहयोग फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा आकाशवाणी आणि मतकर झोपडपट्टी परिसरातील ७५ विद्यार्थ्याना शैक्षणिक पालकत्व अभियान २०२२ अंतर्गत शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.
सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रंजनाताई रावत, उपनगराध्यक्ष मनोजभाऊ शेंडे, पत्रकार गौरी आवळे, बार्टी संस्थेचे समतादूत विशाल कांबळे, सक्षम संस्थेचे दीपक वाळिंबे, देवधर सर, डॉ. कुंभार सर, सूर्यवंशी दादा यांच्या हस्ते शालेय साहित्य व खाऊ वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा रंजनाताई रावत यांनी युवा ग्रामविकास सामाजिक सेवा संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. युवाग्राम च्या माध्यमातून गणेश वाघमारे आकाशवाणी आणि मतकर झोपडपट्टी परिसरात शाश्वत सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्न करीत आहेत. आजच्या कार्यक्रमामुळे आकाशवाणी आणि मतकर परिसरात भविष्यात शिक्षित युवा पिढी पाहायला मिळत आहे. आकाशवाणी मधून भविष्यात मोठे अधिकारी तयार व्हावे. अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी गणेशआबा वाघमारे यांनी युवाग्राम संस्थेच्या कामविषयी माहिती दिली तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत पाहुण्याचे स्वागत केले.
खा. छ. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आकाशवाणी व मतकर झोपडपट्टी अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी दीड कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. परीसरासाठी नागरिकांच्या आणि येथील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक सभागृह बांधण्याचे प्रयत्न तसेच स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरि प्रयत्न करणार असल्याचे मनोजभाऊ शेंडे यांनी सांगितले. यावेळी वीरांगना प्रतिष्ठान च्या अध्यक्ष पत्रकार गौरी आवळे, विशाल कांबळे, दीपक वाळिंबे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थित सर्व विद्यार्थी व नागरिक यांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार विशाल कांबळे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वीयणे पर पाडण्यासाठी युवाग्राम संस्थेचे संचालक तुषार बोकेफोडे, मनोज जगताप, बाळासाहेब खुडे, मनीषा कांबळे, रोहित रणदिवे, सुशांत वायदंडे, लक्षण चव्हाण, शंकर आव्हाड, सनी खवळे, सुरेखा वाघमारे, अंजणा खुडे, संजीवनी सोनवणे, गौरी जाधव, दीपा जगताप, दर्शन नगरे यांनी कार्य केले.